खानापूर मठ गल्लीतील स्वामी विवेकानंद स्कूल व चिरमुरकर गल्लीतील मराठी शाळेच्या प्रांगणातील पेवर बसविण्याच्या कार्याला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते पूजन करून सुरुवात करण्यात आली
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल भाजपा युवा नेते पंडित ओगले, भाजपा जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, नगरसेवक आपय्या कोडोळी वसंत देसाई, प्रकाश नीलजकर, स्वामी विवेकानंद संस्थेचे ज्येष्ठ संचालक सदानंद कपीलेश्वरी संस्थेचे अध्यक्ष जयंत तिनेकर, अँड चेतन मणेरीकर, अमोल शहापूरकर, सुहास कुलकर्णी, प्रिन्सिपल श्रध्दा पाटील, बाळाराम सावंत या मान्यवरांच्या हस्ते पायाखोदाई करून सुरूवात करण्यात आली, यावेळी प्रमोद कोचेरी, संजय कुबल यांनी आपले विचार व्यक्त केले, यावेळी स्वागत व आभार संस्थेचे संचालक अँड चेतन मणेरीकर यानी केले
तर सरकारी मराठी शाळेच्या प्रांगणातील भूमीपूजन प्रमोद कोचेरी, संजय कुबल, गुंडू तोप्पीनकट्टी, एसडीएमसी अध्यक्ष धाकलू गुरव, वसंत देसाई, आपय्या कोडोळी,राजु जांबोटकर, रवींद्र गुरव, तसेच शाळेचे शिक्षक वर्ग या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, सदर पेवर बसविण्यासाठी एमएलसी फंडातून फंड मंजूर करण्यासाठी प्रमोद कोचेरी यांनी प्रयत्न केल्याबद्दल त्यांना व एमएलसी हनुमंत नीराणी यांना स्वामी विवेकानंद संस्थेतर्फे धन्यवाद देण्यात आले,