तालुका पंचायतीच्या वतीनें नीलावडे, नीटूर, ईदलहोंड, हलकर्णी, पारवड, गोल्याळी, नागरगाळी, व करंबळ ग्रां पं सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, पीडीओ या सर्वांना 17 ऑक्टोंबर पासुन तीन दिवसाचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये प्रत्येक पंचायतीच्या व्याप्तीतील गावातील समस्या ऐकुन घेतल्या जात असून त्यामध्यें गावात रस्ते, पाणी, दवाखाना व कोणत्या सुवीधा कमी आहेत याची माहिती घेतली जात असुन त्या सोडविण्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करण्यात येवुन संगणकात साठविण्यात येत आहे, त्या प्रमाणे पाच वर्षांत गावचा विकास करण्यात येणार असल्याचा सरकारचा प्लँन असल्याचे समजते पण सदस्यांना सरकारचे हे धोरण पसंद नसल्याचे समजते कारण तालुका पंचायतीमधुनच हि धोरण राबवली जात असतील तर ग्रां पंचायत सदस्यांचा काय उपयोग सदस्यांच्या अधिकारावर एकप्रकारे गदा आणण्याचे काम सरकार करत आहे अशी नाराजी या ठिकाणी उपस्थित असलेले सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष व खानापूर तालुका ग्रां पं सदस्य संघटनेचे पदाधिकारी बोलून दाखवत आहेत, तीन दिवसाचे हे प्रशिक्षण असुन टप्याटप्याने तालूक्यातील सर्व पंचायतीना बोलाविण्यात येणार असल्याचे समजते,