खानापूर तालुक्यातील नंदगड ग्रामपंचायतीमध्ये उपाध्यक्ष व ईतर सर्व ग्रां पं सदस्यांना अंधारात ठेवून बराच मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करून संबधितावर कायदेशीर कारवाई करणे बाबत उपाध्यक्ष व 19 सदस्यांनी विविध ठिकाणी तक्रारी देवुन दोन महिने झाले तरी अजुन त्याची दखल घेण्यात आली नाही त्यासाठी आज तालुका पंचायतीचे ई ओ वीरन्नगौडा ईगन्नगौडर, यांना नंदगड ग्रां पं चे उपाध्यक्ष मन्सूर ताहसीलदार, लक्ष्मण बोटेकर, सुनील पारीश्वाडी, एस एम हुलबती, शफी कागजी व आदि सदस्यांनी निवेदन देवुन मागणी केली आहे की 20 ऑक्टोंबर 2022 च्या आत भ्रष्टाचाराची चौकशी करून संबधितावर जर कारवाई केला नाही तर दि 20 ऑक्टोंबर रोजी संपुर्ण नंदगड ग्रामस्थांना व सर्व ग्रां पं सदस्यांना घेऊन नंदगड ग्रां पं च्या आवारात बेमुदत धरणे सत्याग्रहाला सुरूवात करण्यात येईल असा इशारा देण्यात आला,