
के एल ई संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ प्रभाकर कोरे यांचा उद्या अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळा जिल्हा क्रीडांगणावर दोन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भव्य आणी दिव्य प्रमाणात साजरा होत आहे त्या पार्श्वभूमीवर उद्या शुभेच्छा देण्यास वेळ मिळणार नाहीत म्हणून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी आमदार व डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील, सुभाष गुळशेट्टी, माजी जिल्हा परिषद सदस्य जोतीबा रेमाणी, जनरल सेक्रेटरी गुंडू तोप्पीनकट्टी, नगरसेवक आपय्या कोडोळी यांनी आज सायंकाळी डॉ प्रभाकर कोरे यांची बेळगाव येथे भेट घेऊन खानापूर भाजपा तर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,

