खानापुरा : खानापुरा तालुक्यातील जांबोटी-चोर्ला महामार्गावर अवैध दारू विक्री करणाऱ्या वाहनावर छापा टाकून जिल्हा पोलिसांनी एकाला अटक करून 216 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त करून दोघांना अटक केली
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गोरक्षनाथ नवनाथ पन्नालाल (वय ३२) आणि सुरेश गोरख मोघे (वय ३०) यांना अटक करण्यात आली. असून त्यांच्याकडून 180 दारूच्या बाटल्या (216लिटर) दारू जप्त केली व वाहतूकीसाठी वापरलेले 4 लाखाचे चार चाकी वहाण जप्त केले,
याबाबत मिळालेली माहिती अशी की गुरुवारी दुपारी बारा वाजता पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कणकुंबी चेक नाक्यावर गस्त घालत असताना, एम एच 46 पी 48 82 हे वाहन जांबोटीकडे जात असताना सदर वाहनाची झडती घेतली असता 180 दारूच्या बाटल्या त्याची किंमत वीस 20520 रू व 4 लाखाचे वाहन जप्त करण्यात आले,