खानापूर : जांबोटी रस्त्याला मोदेकोप जवळ जप्त केलेला दारू साठा अधिकाऱ्याकडूनच हडप केल्याचा प्रकार खानापुरात घडला आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोघा अबकारी निरीक्षकासह पाच जणांचे निलंबन केले आहे
मागील आठवड्यात आठ दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यातील मोदेकोप क्रॉस जवळ अबकारी अधिकाऱ्यांनी गोवा बनावटीची दारू जप्त केली होती या साठ्यातील सुमारे 300 एक बॉक्स दारू साठा अधिकाऱ्यांनीच हडपल्याचा प्रकार उघडकीस आला असून यासंबंधी अबकारी निरीक्षकासह पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे, मंगळवार दिनांक 7 मार्च रोजी दुपारी जांबोटी रस्त्यावरील मोदेकोप क्रॉस जवळ जी जे 10 टी पी 8276 क्रमांकाचा 12 चाकी कंटेनर अडवून तपासणी करण्यात आली असता त्या कंटेनर मध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू अढळून आली होती वाहन चालक चंद्रकांत गजेंद्र शेरे वय 27 याला अटक करण्यात आली होती या वाहनातून 452 बॉक्स इम्पिरियल ब्लू व्हिस्की जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली होती मात्र प्रत्यक्षात या वाहनात 753 बॉक्स इतका दारू साठा होता यापैकी 301 एक बॉक्स अधिकाऱ्यांनी परस्पर हडपल्याचे उघडकीस आले आहे या प्रकाराने एकच खळबळ माजली असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात आली आहे मात्र जप्त दारू साठा अधिकाऱ्यांनीच हडप करून खानापूर विभागीय कार्यालयात 202 बॉक्स व सुरल येथे 99 बॉक्स काढून ठेवण्यात आले होते व प्रत्यक्ष कंटेनर मोदेकोप येथे पकडण्यात आले असे दाखविण्यात आले होते मात्र प्रत्यक्ष गाडी सुरल नाक्यावरच पकडली असल्याचे समजते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा साठा ताब्यात घेतला असून या संबंधि संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आले आहे
हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर खानापूर विभागाचे निरीक्षक दावलसाब शींदोगी कणकुंबी तपास नाक्याचे अबकारी निरीक्षक सदाशिव कोरती कणकुंबी तपास नाक्याच्या अबकारी उपनिरीक्षक पुष्पा गडादी यांच्यासह आणखी एक अधिकारी असे एकूण चार अधिकारी व एक कर्मचारी अशा पाच जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे अबकारी उपायुक्त एम एम वनजाक्षी यांनीही कारवाई केली आहे सुरुवातीला वाहनासह 67 लाख 73 हजार 120 रुपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अबकारी विभागातील अधिकाऱ्यांनी होती आता पुन्हा 301 बॉक्स दारू साठा जप्त केल्यामुळे याची एकूण किंमत 99 लाख 72 हजार 680 रुपये इतकी होते, यामुळे तालूक्यात खळबळ माजली आहे