गोवा हेल्थ फाउंडेशन यांचे मार्फत दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी पणजी येथे घेण्यात आलेल्या 21 किलोमीटर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत कल्लाप्पा तिरविर यांनी दुसरे पारितोषिक पटकाविले सदर 21 किलोमीटरचे अंतर पार करण्यास त्यांना 1 तास 47 मिनिटे लागली
आपला देश एकीकडे व्यसनाधीन होत असताना खानापूर तालुक्यातील तोप्पीनकट्टी गावचे सुपुत्र कल्लाप्पा मल्लाप्पा तिरविर हे खेळ व खेळाचे महत्व इतरांना पटवून देत असतात ते वयाच्या पंधराव्या वर्षापासून खेळाकडे कसे आकर्षित झाले ते त्यांनाच कळले नाही खोखो, कबड्डी, यासारखे खेळ खेळत असताना ते 1990 पासून ते 2023 या 33 वर्षांमध्ये लांब पल्ल्याचे धावण्याचे अंतर राष्ट्रीय धावपटू कधी तयार झाले ते त्यांना कळालेच नाही
ते दररोज न चुकता दहा ते पंधरा किलोमीटर धावण्याचा सराव करत असतात आत्तापर्यंत त्यांनी पन्नास किलोमीटर स्पर्धेत पाच वेळा, 42 किलोमीटर फुल मॅरेथॉनमध्ये 30 वेळा, 21 किलोमीटरमध्ये 50 वेळा, दहा किलोमीटर स्पर्धेत 40 वेळा स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे तर 2018 मध्ये थायलंड येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन स्पर्धेत पाच किलोमीटर जलद चालण्याॉच्या प्रकारात पाचवा क्रमांक मिळवून भारत देशात आपल्या गावाबरोबरच तालुक्याचे नाव देश पातळीवर लौकिक केले यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय कोच सुभाष पवार, ए जी पाटील सर, कोलेकर सर, लक्ष्मण पाटील सर, तसेच सामाजीक कार्यकर्ते संचालक यल्लाप्पा तिरविर यांचे मोलाचे सहकार्य लाभले, खेळाबरोबर व्यसनापासून कसे दूर राहता येईल यांची जाणीव तरूण वर्गाला ते करत असतात,