
आज बेळगाव येथे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका अध्यक्ष संजय कुबल वन निगम कर्नाटक राज्य संचालक सुरेश देसाई यांनी बेळगाव KSRTC चे DC डीसींची भेट घेऊन तालुक्यातील बस समस्या बद्दल चर्चा केली व बस सेवा सुरळीत करून खानापूर बेळगाव बस फेऱ्या वाढविण्याची मागणी केली
खानापूर ते बेळगाव शिक्षणासाठी प्रवास करणार्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून सकाळी खानापूर ते बेळगाव बस संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळा कॉलेजला जाण्यास उशीर होत असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे त्यासाठी सकाळी बेळगाव ला जाण्यासाठी बस संख्या वाढवुन बस फेरीत वाढ करावीत, तसेच तालुक्यातील बैलूर,शिरोली, गावांना जाणाऱ्या बस अनियमित येत असून त्या बस सेवा सुरळीत कराव्यात तसेच खानापूरहून बेळगावला ज्या बस जातात त्या इंदलहोंड कत्रीला न थांबता थेट महामार्गावरील ब्रिजवरून जात आहेत त्या बस महामार्गावरील पुलावरून न जाता खाली सर्वीस रस्त्यावर उतरून इंदलहोंड कत्रिला थांबून विद्यार्थी व प्रवासी वर्गाला घेऊन जाण्याचीही मागणी केली,

या मागण्यांची डीसी नी गंभीर दखल घेतली असून बेळगाव येथे सुरू असलेलें अधिवेशन संपल्यानंतर ताबडतोब तुमच्या समस्या सोडवुन बससेवा सुरळीत करून देतो व जादा बस गाड्या उपलब्ध करून बस फेरीत वाढ करण्यात येईल असे सांगितले,
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, कर्नाटक वन निगमचे संचालक सुरेश देसाई, व भाजपाचे आदि नेतेमंडळी उपस्थित होते,
