
छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित 350 कलाकारांनी भाग घेऊन सादर करण्यात येणारे शिंवगर्जना नाट्य खानापुरातील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या पटांगणावर 7 जानेवारी ते 10 जानेवारी पर्यंत चार दिवस तालुक्यातील नागरिकांसाठी महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी यांच्या वतीने व भाजपा च्या सहकार्याने लोकांना मोफत पाहण्याचे आयोजन केल्याची माहिती महालक्ष्मी ग्रुपचे अध्यक्ष लैला शुगरचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांनी शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मध्ये बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली,
तत्पूर्वी लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत करून पत्रकार परिषदेला सुरुवात केली,
विठ्ठलराव हलगेकर यांनी पुढे माहीती देताना सांगितले की दिं ५ जानेवारी आणी ६ जानेवारी असे दोन दिवस शांतीनीकेतन शाळेच्या स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर सिंहगर्जना नाट्याचे उदघाटन 7 जानेवारी 2023 रोजी भाजपाच्या अनेक थोर मोठ्या नेतेमंडळींना बोलावून करण्यात येणार असून तालुक्यातील दुर्गम भागातील व ईतर भागातून जवळजवळ १४ हजार लोकांना नाट्य पहाण्यासाठी घेऊन येण्याची व्यवस्था केली असून त्या दिवशी त्यांच्या जेवणाची सुद्धा मोफत सोय केल्याची माहिती त्यांनी दिली तसेच पटांगणावर महानाट्य पहाण्यासाठी प्रेक्षकांना १४ हजार लोकांना बसण्याची क्षमता असलेली गॅलरी बनविण्यात येणार असून एका वेळेस १४ हजार लोकांना बसून महानाट्य पहाण्याची व्यवस्था करण्यात येणार असून ७ जानेवारी ते १० जानेवारी या चार दिवसांत प्रती दिवशी १४ हजार लोकांना मोफत नाट्य दाखविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच दररोज महानाट्य सुरू होण्यापूर्वी विविध कलाक्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले,

यावेळी शिंवगर्जना नाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव माहिती देताना म्हणाले की या नाट्यात एकूण ३५० पेक्षा जास्त नाट्य कलाकारांचा सहभाग असून यामध्ये पन्नास टक्के कलाकार खानापूर तालुक्यातून घेणार असून त्यासाठी येत्या गुरुवारी सकाळी 11 वाजता अकरा वर्षाच्या लहान मुलापासून सत्तर वर्षाच्या कलाकारांना यात भाग घेण्यासाठी त्यांची मुलाखत घेण्यात येणार असून सदर मुलाखतीचे शांतिनिकेतन पब्लिक स्कूल येथे आयोजन करण्यात आले आहे शिवगर्जना नाट्यात कलाकार म्हणून ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी येत्या गुरूवारी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे


यावेळी महालक्ष्मी ग्रुपचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर लैला शुगरचे एम डी सदानंद पाटील, व्हाईस चेअरमन विठ्ठल करंबळकर, संचालक चांगाप्पा निलजकर, बांदिवडेकर साहेब, यल्लापा तीरवीर, तुकाराम हुंद्रे, राजू हलगेकर, नारायण हलगेकर, बाळगौडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते भरमाणी पाटील, राजू सीध्दानी, भाजपाचे बसू सानीकोप, श्रीकांत ईटगी, महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव, अभिजीत कालेकर खानापूर व नाट्यसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते
