श्री मलप्रभा नदी घाट सेवा ट्रस्टच्या वतीने प्रतीवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात आलेला गंगापूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला,
सायंकाळी ६ वाजता श्रीराम मंदिर येथुन टाळ व घंटानादाच्या आवाजात गंगा मातेची मुर्ती श्रीमलप्रभा नदि घाट येथे आणुन यजमान म्हणून सहपत्नी उपस्थित असलेले भाजपा नेते विठ्ठलराव हलगेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, निवृत्त फॉरेस्ट ऑफीसर मल्लापा बेनकट्टी, जोतीबा रेमाणी, नागराज कलबुर्गी, कीरण यळूरकर यांच्या हस्ते मुर्तीची पुजा व महाआरती करण्यात येवुन कार्तीकोत्सव व दिपोत्सवाला सुरूवात करण्यात आली,
यानंतर रांगेत थांबलेल्या महिलांनी देवीची ओटी भरण्यास व श्रीफळ वाढविण्यास सुरूवात केली, या उत्सवाच्या अनुषंगाने गंगेची नवीन लाकडी मुर्ती बनविण्यात आल्याने घाटकमीटीचे अध्यक्ष आर पी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक छोटीसी सभा घेण्यात आली, यामध्ये मुर्तीकार हनमंत सुतार यांचा सत्कार करण्यात आला,
यावेळी प्रमोद कोचेरी, विठ्ठलराव हलगेकर, जोतीबा रेमाणी, कीरण यळूरकर, नागराज कलबुर्गी यांची भाषणे झाली, यावेळी नवीन मुर्ती साठी विठ्ठलराव हलगेकर यांनी 15 हजार, प्रमोद कोचेरी यांनी २१ हजार, कीरण यळूरकर यांनी ११ हजार जोतीबा रेमाणी यांनी ११ हजार, मल्लापा बेनकट्टी यांनी ५ हजार व नागराज कलबुर्गी यांनी ५ हजार रुपयांची देणगी दिली,
कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण प्रकाश देशपांडे यांनी केले तर सुत्र संचालन सेक्रेटरी वसंत देसाई यांनी तर आभार प्रदर्शन संजय कुबल यांनी केले, यावेळी ट्रस्टचे सभासद सुभाष देशपांडे, सदानंद कपीलेश्वरी, दिनकर मरगाळे, श्रीकांत नाटेकर, मनोज रेवणकर, अँड सिध्दार्थ कपीलेश्वरी, नीळकंठ पुजारी, सर्वज्ञ कपीलेश्वरी, आप्पया कोडोळी, विठ्ठल हळदणकर, अजीत सैल, पुंडलीक खडपे, वासुदेव साखळकर,, व आदि मान्यवर उपस्थित होते, यानंतर रात्री १० वा उतर पुजा होवुन उत्सवाची सांगता करण्यात आली,