पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे स्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदै’वत असून ते जेजुरीचा खंडोबा या नावाने ओळखले जातात. महाराष्ट्राचे श्र’द्धास्थान व अठरा पगड जातीचे कुलदै’वत म्हणून प्रसिद्ध असणारी ही जेजुरी. जेजुरी चे खंडोबा हे प्रसि’द्ध देव आहेत. खंडोबा यांना खंडेराय म्हंटले जाते. खंडोबा हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दै’वत मानले जाते. खंडोबा हे अनेक जणांचे कुलदै’वत आहेत.
आपल्या महाराष्ट्र मध्ये पंढरपूर चे विठ्ठल, कोल्हापूर चे जोतिबा आणि जेजुरीचे खंडोबा भ’क्त आहेत. खंडोबा हे मराठा, रामोशी आणि धनगर स’माजाचे कुलदै’वत मानले जाते. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधण्यात आले असून ते तीन शतकापूर्वी चे देऊळ आहे. खंडोबाचे जुने स्थान कडेपठारावर आहे. पण खंडोबा हे देव जुन्या गडावरून नवीन गडावर कसे आले याबद्दल फारसी कल्पना कोणालाही नाही.
आज आपण खंडोबा हे देव जुन्या गडावरून नवीन गडावर कसे आले याबद्दल जाणून घेऊया….
सुपे परगण्यातील ‘खैरे’ हे भ’क्त कित्येक वर्षांपासून खंडोबा देवाची भ’क्ती करत होते. तो भ’क्त कायम म्हणजेच बारा महिने कऱ्हेचे पाणी नदीतून नेऊन गडावर पायी जाऊन खंडोबाची पूजा करीत असे. कालांतराने त्याचे वय झाल्यामुळे त्याला ते शक्य होत नव्हते. तेव्हा त्या भ’क्ताने खंडोबा देवाला विनंती केली की ‘मी आता थकलो असून माझ्या हातून सेवा होणे आता काय शक्य नाही’ त्यावेळी खंडोबाने सांगितले की ‘ तू ज्या ठिकाणी दमशील त्या ठिकाणी मी अवतरेण’ आणि खंडोबा देवाने जो म्हलारी मार्तंड गड आहे त्या गडाला जेजुरगड म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणीच त्यांनी वास्तव केले. पण असे म्हंटले जाते की खंडोबा देवाचे मूळ स्थान कडेपठारच असल्याचे सांगण्यात येत आहे.
खंडोबा देवाचा अवतार भगवान शंकरांना का घ्यावा लागला असेल ते आपण जाणून घेऊया…. प्राचीन काळात अशी कथा सांगितली जाते की, लावथळेश्वर डोंगरावर एक मोठे ऋ’षि मुनी वास करत होते आणि त्याचदरम्यान ‘मणिआणि मल्ल’ हे ऋ’षि मुनीं सोबतच अनेक दै’त्यांना त्रास देत असत. आणि सर्वांनी मिळून भगवान शंकराची आराध’ना करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यावर प्रकट होऊन भगवान शंकरांनी दै’त्यांचा सं’हार केला असे या कथेनुसार सांगण्यात येते.
काळभैरव म्हणजेच मार्तंड भैरवांच्या दोन पत्नी होत्या त्या कशा ते पाहूया…. एकदा नेवाशीच्या मोठ्या व्यापाऱ्याच्या स्वप्नात आपल्या मुलीचे लग्न खंडोबाशी झाले असे पडले होते. त्यांनतर पाली येथे म्हाळसा आणि खंडोबाचे लग्न पार पडले. त्यानंतर खंडोबा देव यांनी धनगर समाजातील ‘बाणाई’ हिला पाहिले आणि त्यांना तिच्याशी लग्न करता यावे म्हणून म्हाळसा बरोबर सारीपाटाचा खेळ खेळण्यात आला होता आणि यामध्ये हरल्यानंतर त्यांना बारा वर्षे वनवासात काढायची होती आणि पुढे असेच घडले.
वनवास लागल्यानंतर ते ‘बाणाई’ च्या बाबाकडे देवरूपात येऊंन त्यांच्या मेंढ्या सांभाळू लागले. एके दिवशी त्याच्या सगळ्या मेंढ्या मा’रून टाकून बाणाई शी लग्न लावून दिल्यानंतर त्या सर्व मेंढ्या जि’वंत करीन असे त्यांनी सांगितले. आणि त्यांनतर खंडोबा चे बाणाईशी लग्न झाले. जेजुरीचे मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या मंदिर वा’स्तुकलेच्या प’रंपरेच्या प्रगतीचा महत्वाचा टप्पा मानला जातो. जेजुरी हे खंडोबाचे जा’गृत समजले जाणारे देवस्थान मानण्यात येते.