खानापूर: दि 13
खानापूर येथील श्री मलप्रभा नदीच्या पात्रात मिळालेल्या अनोळखी मृतदेहावर पोलीसांनी कदंबा फाऊंडेशनचे अध्यक्ष जॉर्डन गोन्सालवीस व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने दि ११ नोव्हेंबर रोजी अंतिम संस्कार केले होते त्या मृतदेहाची ओळख पटली असुन सदर वृद्ध शिवाजीनगर बेळगाव येथील असुन त्यांचे नाव रामचंद्र चौगुले वय वर्षे 70 असल्याचे समजते,
सोशल मीडिया वरील बातमी वाचून त्यांचे नातेवाईक खानापूर पोलीस स्थानकात येवुन मृतदेहाचे फोटो व मृतदेहावर असलेल्या ईतर गोष्टींची पडताळणी करून सदर वृद्ध आपलेच असल्याची खात्री पटवुन घेतली व कदंबा फाऊंडेशनचे अध्यक्ष जॉर्डन गोन्सालवीस, व त्यांच्या सहकार्यांना तसेच पोलीस खात्याला धन्यवाद दिल्याचे समजते,
याबाबत मिळालेली खात्रीलायक माहिती की रामचंद्र चौगुले हे वृद्ध पांगुळ गल्लीतील सिद्धार्थ होलसेल कापड दुकानात कामाला होते व वरचेवर खानापूर शहरातील कापड दुकानदारांना दिलेल्या कापडांची वसुली करण्यासाठी येत होते पण काही दिवसांपासून त्यांची शुगर जास्त झाल्याने वरचेवर ते चक्कर येवुन पडत असल्याने त्यांनी कामावर यायचे सोडले होते, व नेहमी घरातील लोकांना आपल्याला आजाराचा त्रास होत असुन आजाराला कंटाळलो असल्याचे नेहमीच बोलून दाखवत होते असे समजते,