आंदोलनं करणारांनी, निवेदने देणारांनी, आता मुख्यमंत्र्यांकडून कामे करून घ्यावीत अशी मागणी डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी केली आहे, त्या पुढे म्हणतात की
मान, हुळंद च्या प्रश्नासाठी किंवा आमगाव च्या रस्त्यासाठी तहसिलदार किंवा डीसी ना निवेदने देऊन लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा आता आज ९ तारखेला बीजेपीच्या नेतेमंडळींनी स्वत:च्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सांगून हे प्रश्न निकाली काढावेत …
डीसी रस्ता मंजूर करत नाही किंवा डिसी आमगावच्या रोडसाठी निधी देत नाही
निधी सरकार देते …
काम मंजूर पण सरकारच करते एवढी तरी जाण पाहीजे की नाही ?
उगी लोकांना गंडवायचे …
मान चा रस्ता मंजूर आहे निधी सुद्धा तसाच आहे
हुळंद मान च्या लोकांच्या घरांना वनखाते नोटीसा देत आहे … तहसिलदार किंवा डिसी ना निवेदन देऊन हे काम होत नाही तर सरकार दरबारी जाऊन वनमंत्री किंवा सीएम ना सांगायचे सोडून जांबोटी भागातील किंवा बेळगावची बीजेपीची नेते मंडळी, अधिकारी वर्गाला निवेदने देत बसतात व जनतेला आपण काय तरी करतोय हे भासवतात थोडक्यात काय तर लोकांना गंडवायचे …
आता मुख्यमंत्री साहेब तालुक्यात येत आहेत ज्यांनी ज्यांनी निवेदने दिली त्यांनी आता सीएम साहेबांना सांगून डायरेक्ट काम करून घ्या …
मुख्यमंत्री येऊन गेल्यावर , नंतर अधिकार्यांना निवेदने देण्याचे नाटक करू नये ही विनंती …
रयतांना ऊस वाहतूकीसाठी जे जे रस्ते पाहीजेत ते ते रस्ते आता सीएम साहेबांकडून ९ तारखेला डायरेक्ट मंजूर करून घेऊन शॉर्ट टेंडर काढून ८-१० दिवसांत रोडच्या कामाला सुरूवात करावी ….
मी आमदार म्हणून सरकार दरबारी जे जे करायला पाहीजे, प्रस्ताव पाठविणे, पाठपुरावा करणे, मंत्री महोदय किंवा सीएम ना भेटणे हे सर्व करून झाले आहे परंतु बीजेपीचे हे मायबाप सरकार कुंभकर्णाच्या भूमिकेत गेले आहे…
मुख्यमंत्री साहेबांना पण विनंती तुमचा खानापूर दौरा म्हणजे नुसतीच राजकीय भाषणबाजी न ठरता खानापूरच्या विकासासाठी फलदायी ठरावा एवढीच अपेक्षा !