श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराला आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोदजी सावंत यांनी भेट दिली यावेळी त्यांचे स्वागत मंदिर कमिटीचे अध्यक्ष श्री सुनील बाळेकुंद्री, श्री राकेश कलघटगी, श्री राजू भातखांडे व चिकमंगळूर दत्तात्रयमठाचे पुरोहित समूह यांच्याकडून मंत्रांच्या उद्घोषणा ने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी मंदिरामध्ये कालसर्प शांती चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमोद जी सावंत यांनी कालसर्प मंडळाचे दर्शन घेतले व मंदिराच्या सुधारणांची प्रशंसा केली पुढील काळात गोव्याच्या लोकांनी देखील या कालसर्प शांती मध्ये सहभागी व्हावे अशी आशा व्यक्त केली मंदिर ट्रस्टच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री व दत्तात्रेयमठाचे मठाधिपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मंदिराच ट्रस्टी सुनील बाळेकुंद्री, राजू भातखंडे ,अभिजित चव्हाण ,राकेश कलघटगी,राहूल कुरणे, विवेक पाटील, प्रसाद बाचुळकर , अभय लगाडे, अनिल मूतकेकर,जोतिबा कावळे, विकास शिंदे, दौलत जाधव, संजय मनगुतकर, सचिन आनंदाचे, गणेश देवर, विलास पाटील, प्रकाश घोरपडे, आदी सेवेकरी उपस्थित होते