वयोवृद्ध माजी सैनिकाला पोलिसांकडून बूटांनी मारहाण – हेल्मेट नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून अत्याचार ; व्हिडिओ व्हायरल, जनतेत तीव्र संताप
नंदगड : कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच नियमांचे उल्लंघन करून वयोवृद्ध माजी सैनिकावर अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यातील नंदगड येथे घडला आहे. हेल्मेट नाही म्हणून थांबवलेल्या माजी सैनिकाला 4–5 पोलिसांनी बूटांनी मारहाण करून जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये ओढत नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
घटनेनुसार, नंदगडमधील एका सार्वजनिक चौकात वयोवृद्ध असलेल्या माजी सैनिकांने हेल्मेट घातले नसल्याने पोलिसांनी त्यांना थांबवले. यावेळी अनुचितरित्या बळाचा वापर करून बूटांनी मारहाण केली आणि ओढत पोलीस स्टेशनमध्ये नेले. ही संपूर्ण घटना नागरीकांच्या मोबाइलमध्ये कैद झाली असून व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
पत्रकारांनी या प्रकरणी नंदगड पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधला असता, हेल्मेट नव्हते, कागदपत्रे नव्हती, वाहन थांबवले नाही आणि माजी सैनिकांनी आमच्यावर हात उगारला, असे उत्तर देत त्यांनी विषय झटकून टाकला. पत्रकारांनी जेव्हा बॉडी कॅमेरा फुटेज मागणी करण्यात आली तेव्हा “मी सभेत आहे” असे सांगत निरीक्षकांनी फोन कट केला. त्यानंतर पीएसआय यांच्याकडूनही अगदी त्याच स्वरूपाचे उत्तर मिळाले.
मात्र, प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पोलिसांचा दावा फेटाळत “वयोवृद्ध व्यक्ती पोलिसांवर हात उगारू शकतच नाही; चूक पूर्णपणे पोलिसांचीच आहे” असा ठाम आरोप केला आहे.
कायदा मोडला असला तरी दंडात्मक कारवाई करणे हीच नियमानुसार कर्तव्य होता. परंतु बूटांनी मारहाण करून पोलिसी दहशत निर्माण करणे पूर्णतः गैर असल्याचे नागरिकांचे मत आहे.
या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून गृह मंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
“देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाचा सन्मान करण्याऐवजी त्याला बूटांनी मारहाण करणे हे मानवतेलाही काळीमा फासणारे कृत्य आहे; नंदगड पोलिसांवर तातडीने शिस्तभंगात्मक कारवाई व्हावी” अशी लोकांची ठाम मागणी आहे.
🔻 घटनेबाबत नागरिकांची मागणी ✔ दोषी पोलिसांचे निलंबन करणे.
✔ व्हायरल व्हिडिओ व सीसीटीव्ही तपास करणे.
✔ बॉडी कॅमेरा फुटेज सार्वजनिक करणे.
✔ पीडित माजी सैनिकाला न्याय व भरपाई देणे.
ವಯೋವೃದ್ಧ ಮಾಜಿ ಯೋಧನಿಗೆ ಬೂಟುಗಾಲಿನಿಂದ ಒದ್ದ ಪೊಲೀಸರು!!!
ಕೇವಲ ಹೆಟ್ ಧರಿಸಿಲ್ಲ ಎಂಬ ಕಾರಣಕ್ಕೆ ವಯೋವೃದ್ಧ ಮಾಜಿ ಯೋಧನನ್ನು ಬೂಟುಗಾಲಿನಿಂದ ಒದ್ದು ಹಲ್ಲೆ ನಡೆಸಿ, ಠಾಣೆ ಕರೆದೊಯ್ದ ಘಟನೆ ಖಾನಾಪೂರ ತಾಲೂಕಿನ ನಂದಗಡದಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದು, ಸಾರ್ವಜನಿಕರ ಆಕ್ರೋಶಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಿದೆ.
ಹೌದು, ಖಾನಾಪೂರ ತಾಲೂಕಿನ ನಂದಗಡದ ಸಾರ್ವಜನಿಕ ವೃತ್ತವೊಂದರಲ್ಲಿ ಹೆಲ್ಮಟ್ ಧರಿಸಿಲ್ಲ ಎಂಬ ಕಾರಣಕ್ಕೆ ವಯೋವೃದ್ಧ ಮಾಜಿ ಯೋಧನನ್ನು 4-5 ಜನ ಪೊಲೀಸರು ಬೂಟುಗಾಲಿನಿಂದ ಒದ್ದು, ಠಾಣೆಗೆ ಏಳೆದೊಯ್ದಿದ್ದು, ಹಲ್ಲೆಯ ವಿಡೀಯೋ ಎಲ್ಲೆಡೆ ವೈರಲ್ ಆಗಿದೆ.
ನಂದಗಡ ಇನ್ಸಪೇಕ್ಟರ್’ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಕೇಳಿದಾಗ ಹೆಲ್ಮಟ್ ಧರಿಸಿರಲಿಲ್ಲ. ಸೂಕ್ತ ದಾಖಲೆಗಳು ಇರಲಿಲ್ಲ. ವಾಹನ ನಿಲ್ಲಿಸಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಕೈ ಮಾಡಿದರು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಆವಾಗ ಬಾಡಿ ಕ್ಯಾಮೆರಾ ಫೂಟೇಜ್ ಕಳುಹಿಸಿ ಎಂದಾಗ ಸಭೆಯಲ್ಲಿದ್ದೆನೆಂದು ಹೇಳಿ ಕರೆ ಕತ್ತರಿಸಿದರು. ನಂತರ ನಂದಗಡ ಪಿ ಎಸ್ ಐ ಅವರು ಅದೇ ಉತ್ತರವನ್ನು ಹೇಳಿದರು. ವಯೋವೃದ್ಧ ಪೊಲೀಸರ ಮೇಲೆ ಕೈ ಮಾಡಲೂ ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ? ಸಾರ್ವಜನಿಕರೂ ಕೂಡ ಪೊಲೀಸರದ್ದೇ ತಪ್ಪಿದೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ. ಕಾನೂನು ಉಲ್ಲಂಘನೆಯಾದರೇ, ದಂಡ ಹಾಕಬೇಕಿತ್ತು. ಈ ರೀತಿ ಓರ್ವ ಮಾಜಿ ವಯೋವೃದ್ಧ ಯೋಧನನ್ನು ಥಳಿಸಿರುವುದು ಎಷ್ಟು ಸರಿ? ಗೃಹ ಸಚಿವರು ಇತ್ತ ಗಮನ ಕೊಟ್ಟು ಈ ವಿಷಯವನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಬೇಕೆಂದು ಜನರು ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ.
ದೇಶ ಕಾಯುವ ಯೋಧನನ್ನು ಗೌರವಿಸುವ ಬದಲೂ ಬೂಟುಗಾಲಿನಿಂದ ಒದ್ದು ದರ್ಪ ತೋರಿರುವ ನಂದಗಡ ಪೊಲೀಸರ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಜನರು ಒತ್ತಾಯಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ.



