
पुण्यात काव्यमित्र संस्थेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण साहेळ्यात निरंजन सरदेसाई यांचा सन्मान.
जागतिक मातृदिन, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती तथा कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतीदिनाचे औचित्य साधून पुण्यात काव्यमित्र संस्थेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण साहेळा संपन्न झाला.
या सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तिंचा, उद्योजकांचा गौरव मा. श्री. संभाजीराव जाधवराव (सरदार लखुजीराजे जाधवराव यांचे 14 वे वंशज व सरसेनापती धनाजी जाधव यांचे 10 वे वंशज) यांचे हस्ते व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खानापूर तालुका म. ए. समितीचे माजी कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांचाही सम्मान केला गेला.
याठिकाणी सौ. शारदा अभिजित पवार यांचा “आठवणींच्या हिंदोळ्यावर” या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी सरदेसाई यांनी बोलायला सुरुवात करताना संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील घोषणा देऊन सीमाप्रश्नाकडे उपस्थितांचे थोडक्यात लक्ष वेधून सहभाग दर्शवला.
