
मधुमेह हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचे प्रमुख कारण आहे. आपल्या देशात सध्याच्या ट्रेंडमध्ये तीन व्यक्तींपैकी एकाला मधुमेह असल्याचे दिसून येते. जाणून घ्या यामागचे कारण.
मधुमेहासह येणारा सर्वात मोठा धोका म्हणजे हृदयाचं आरोग्य जपणे हा आहे. मधुमेह हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचे प्रमुख कारण आहे. आपल्या देशात सध्याच्या ट्रेंडमध्ये तीन व्यक्तींपैकी एकाला मधुमेह असल्याचे दिसून येते. हृदयरोग व मधुमेह यांचा संबंध फार जवळचा असतो. यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे, असे हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे सल्लागार डॉ. प्रमोद कुमार के यांनी सांगितले.
डॉ. प्रमोद कुमार सांगतात, जगभरात मधुमेहाचे प्रमाण वाढतानाच दिसून येत आहे. भारतात मधुमेहाचे प्रमाण वाढत असतानाच, इतर गंभीर अशा आरोग्य समस्या देखील बळावताना दिसून येत आहेत. मधुमेहींमध्ये रक्तदाबाचा विकार जास्त आढळतो. अधिक चरबी, लठ्ठपणा, अनियंत्रित मधुमेह, मानसिक ताण, धूम्रपान यामुळेही हृदयविकाराची शक्यता बळावते. मधुमेहाच्या रोग्यांमध्ये हृदयविकार यातनाविरहित असतो. त्यामुळे अटीतटीचा प्रसंग येण्यापूर्वीच हृदयरोगाचं निदान व्हायला पाहिजे.
