
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील क्रांतीसेना मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीची २०वी वार्षिक सभा लक्ष्मी मंदिराच्या सभागृहात नुकताच संपन्न झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व चेअरमन महादेव मरगाळे होते.
प्रारंभी सेक्रेटरी कृष्णा पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी सेक्रेटरी कृष्णा पाटील अहवाल वाचन करून संस्थेला १० लाख ७ हजार ३०४ रूपये निव्वळ नफा झाला, असे सांगितले. कार्यक्रमाचे औचित्य साधुन करंबळ ग्रामपंचायत उपाध्यक्ष नारायण पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी मष्णू चोपडे, नारायण पाटील, ऍड. केशव कळेकर, बबन सुतार, रत्नाकर लोहार, आदीनी संस्थेच्या हितासाठी व पुढील योजना विषय विचार व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक, चेअरमन महादेव मरगाळे म्हणाले की, संस्थेच्या हितासाठी व समाज प्रबोधनकार्य, असंग्रहित कामगारांसाठी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविल्याबद्दल मत मांडले.
यावेळी सोसायटीचे संचालक, सभासद, हितचिंतक उपस्थित होते. शेवटी आभार प्रकाश गुरव यांनी मानले.
