
गुंजी ता खानापूर येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने काढण्यात आलेल्या दुर्गामाता दौड चे रविवार दि २ ऑक्टोंबर २०२२ रोजी पहाटे गुंजीपासुन सहा किलोमीटर दूर असलेल्या कीरावळे गावात आगमन झाले असता गावच्या वेशीवर दुर्गा माता दौड चा भगवा ध्वज घेण्याचा मान भाजपाचे युवा नेतृत्व व नेते पंडित ओगले यांना देण्यात आला व संपूर्ण गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूजा आरती करून फटाकडी लावून संपूर्ण गावात दौड फिरविण्यात येऊन जोरदार स्वागत करण्यात आले व गावातील नवदुर्गा मंदिरात आरती व शिवाजी महाराजांचे प्रेरणा मंत्र होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी दौंड मध्ये उपस्थित असलेल्या सर्व युवा व महिला वर्गाला तसेच ग्रामस्थांना भाजपाचे युवा नेतृत्व आणि नेते पंडित ओगले यांनी दुर्गामाता दौड तसेच नवरात्र व हिंदू धर्माबद्दल जागृती करणारी माहिती सांगुन मार्गदर्शन केले गुंजी पासून सुमारे पाच किलोमीटर दूर जंगलात वसलेल्या कीरावळे गावात काढण्यात आलेल्या या दौंड मध्ये हजारो लहान मुले युवक युवतीनी भाग घेतला होता त्यामुळे वातावरण अगदी मंत्रमुग्ध झाले होते.
खानापूर : प्रतिनिधी

It’s really a cool and helpful piece of information. I am glad that you shared this helpful
info with us. Please stay us up to date like this.
Thanks for sharing.